धुरी पुन्हा एकदा सर्वोत्कृष्ठ नगरसेवक

वरळी - मुंबईतल्या नामांकित संस्था असलेल्या प्रजा फाउंडेशनने मुंबई महापालिकेतील क्रमांक 1 चे नगरसेवक म्हणून वॉर्ड क्रमांक 187चे नगरसेवक संतोष धुरी यांना काही दिवसांपूर्वी सन्मानित केलं होतं. तर लायन्स क्लब इंटरनॅशनल या सेवाभावी संस्थेनंही बुधवारी मुंबई महापालिकेतील सर्वोत्कृष्ट नगरसेवक म्हणून धुरी यांचा गौरव केला. या गौरव सोहळ्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते हा पुरस्कार संतोष धुरी यांना प्रदान करण्यात आला. या वेळी लायन्स क्लबचे राजेंद्र नागवेकर, मनसे नेते नितीन सरदेसाई, नगरसेवक संदीप देशपांडे, शाखाध्यक्ष शशांक नागवेकर यांच्यासह अनेक मान्यवर आणि मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.

पुढील बातमी
इतर बातम्या