बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) यांच्यावरून शिवसेना आणि भाजपाकडून आरोप-प्रत्यारोपांचा सामना सुरूच आहे. दरम्यान, शिवसेनेचे (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sunjay Raut) यांनी केलेल्या टीकेनंतर अभिनेता सोनू सूद यांनी थेट मातोश्री गाठत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. रात्री साडे दहाच्या सुमारास ही भेट झाली.
मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख हे सोनू सूद यांना घेऊन मातोश्रीवर आले होते. यावेळी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेही त्यांच्या सोबत होते. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( Aaditya Thackeray) यांनी यासंदर्भात ट्विटरवर माहिती दिली. त्यांनी एक फोटो देखील शेअर केला.
सोबतच आणखी एका ट्विटमध्ये आदित्य म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धवजी यांना सोनू सूदला भेटून आनंद झाला. COVID 19 या महामारीत लोकांना कशी मदत करता येईल यावर चर्चा झाली. आमच्यात कुठल्या गैरसमसूतीसाठी जागा नाही. पण सध्या लोकांना दिलेलं वचन पूर्ण करणं हाच हेतू आहे.
सोनू सूद यांनी विस्थापित मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी खूप मदत केली होती. त्याच मदतीवरून संजय राऊत आणि काही शिवसेना नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली होती. भाजप हा सोनू सूदचा बोलविता धनी आहे असं राऊतांनी म्हटलं होतं.
त्यानंतर कॉंग्रेस मंत्री अस्लम शेख यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर सोनू सूद यांची बाजू घेतली. ते म्हणाले की, सोनू सूद प्रवासी कामगारांच्या वेदना समजतात, म्हणूनच तो त्यांना मदत करीत आहे, या विषयावर राजकारण होऊ नये.
काही दिवसांपूर्वीच त्यांनी राज्यपालांचीही भेट घेतली होती. उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या भेटीत सोनू सूदने त्यांना तो करत असलेल्या कामाची माहिती दिली.
हेही वाचा