३३ हजार रुद्राक्षांनी साकारली बाळासाहेबांची प्रतिमा

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज ९३वी जयंती आहे. जयंतिनिमित्त मुंबईतील चेतन राऊत या कलाकारानं रुद्राक्षांनी बाळासाहेब ठाकरेंची प्रतिमा साकारली आहे. शिवसेना भवनासमोरच ही प्रतिमा साकारण्यात आली आहे.

हजारो रुद्राक्षांची प्रतिमा

८ बाय ८ या आकारात ही प्रतिमा साकारण्यात आली आहे. तब्बल ३३ हजार रुद्राक्षांचा वापर करून बाळासाहेबांची प्रतिमा साकारण्यात आली आहे. रुद्राक्षासोबत बाळासाहेब ठाकरेंचं असलेलं नातं काही वेगळं सागांयची गरज नाही. त्यामुळेच त्यांची प्रतिमा रुद्राक्षांनी साकारण्याचा निर्णय चेतनं राऊतनं घेतला. चेतन जे.जे. स्कूल ऑफ आर्टचा विद्यार्थी असून त्यानं त्याच्या १० सहकाऱ्यांच्या मदतीनं ही प्रतिमा साकारली. या माध्यमातून जागतिक विक्रम करण्याचा प्रयत्नही चेतननं केला आहे.

स्मारकाचं आज भूमिपूजन

बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मारकाची घोषणा करण्यात आली होती. घोषणेनुसार महापौर बंगल्याच्या अंडर ग्राऊंडमध्ये स्मारक उभारण्याचा निर्ण घेण्यात आला. बाळासाहेब ठाकरे यांच्या जंयतीदिनी म्हणजेच आज या स्मारकाचं भूमिपूजन करण्यात येणार आहे.

मंगळवारी मंत्रीमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मारकाच्या कामासाठी १०० कोटींचा निधी मंजुर केला आहे. तर महत्त्वाचं म्हणजे स्मारकाच्या उभारणीची जबाबदारी एमएमआरडीएवर टाकण्यात आली आहे. या स्मारकासाठीचा १००  कोटींचा खर्च एमएमआरडीए करणार असून त्यानंतर खर्चाची रक्कम एमएमआरडीएला सरकारकडून दिली जाणार असल्याचीही माहिती समोर येत आहे.

दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म २३ जानेवारी १९२६ रोजी पुण्यात झाला होता. सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक केशव सिताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे आणि रमाबाई यांच्या घरी झाला. बाळासाहेब हे एक उत्कृष्ट व्यंगचित्रकार होते. १९६६ मध्ये त्यांनी शिवसेना पक्षाची स्थापना केली


हेही वाचा

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचं बुधवारी भुमिपुजन, कामाची जबाबदारी एमएमआरडीएकडे

पुढील बातमी
इतर बातम्या