राहुल गांधींना भिवंडी न्यायालयाकडून जामीन

भिवंडी - काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी बुधवारी भिवंडी न्यायालयासमोर दाखल झाले. सकाळी मुंबईतील वांद्रे येथून निघालेले राहुल गांधी न्यायालयात जातानाची ही भिवंडीतली दृष्यं... राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल दाखल झालेल्या खटल्याच्या सुनावणीसाठी राहुल गांधी भिवंडी न्यायालयात उपस्थित झाले. न्यायालयानं त्यांना जामीन मंजूर केला असून पुढील सुनावणी आता 30 जानेवारी 2017 रोजी होईल.

पुढील बातमी
इतर बातम्या