सर्जिकल स्ट्राईकनंतर विजयोत्सव

  • जयाज्योती पेडणेकर & मुंबई लाइव्ह टीम
  • सत्ताकारण

काचपाडा - भारतीय लष्कराने बुधवारी रात्री पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक करून उरी हल्ल्याचा बदला घेतला. या हल्ल्यानंतर मालाड येथे भाजपाच्यावतीने विजयोत्सव साजरा करण्यात आला.

भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राईक करून पाकव्याप्त काश्मिरमधील सात दहशतवादी तळ उध्वस्त केले गेले. दरम्यान गुरुवारी संध्याकाळी मालाड भाजपच्यावतीने रामचंद्र लेन काचपाडा येथील भाजप कार्यालयाबाहेर विजयोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक जया तिवाना, वॉर्ड क्रमांक 31 चे भाजपा अध्यक्ष तजिंदर तिवाना व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

पुढील बातमी
इतर बातम्या