ट्रॅफिक फ्री मुंबईसाठी...

दहिसर - मुंबईला ट्रॅफिक फ्री बनवण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वाहतूक विभागाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष रोशन शेख यांनी स्वाक्षरी अभियान सुरू केलं आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून हे अभियान सुरू करण्यात आलं आहे. या अभियानाचे उद्घाटन प्रवीण दरेकर यांच्या हस्ते करण्यात आलं.

'या स्वाक्षरी मोहिमेत पाच लाख लोकांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात य़ेणार आहेत. त्यानंतर या सह्या असलेले निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देऊन ट्रॅफिकची समस्या सोडवण्याची मागणी करण्यात येईल', असं रोशन शेख यांनी सांगितलं.

पुढील बातमी
इतर बातम्या