भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या आदेशानुसार या ४ बंडखोरांना पक्षातून निलंबित करण्यात आल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे. पक्षशिस्तीचा भंग केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे.
भाजपमधून निलंबित करण्यात आलेल्या बंडखोरामध्ये तुमसरमधील चरण वाघमारे, मिरा भाईंदरमधील गीता जैन, पिंपरी चिंचवडमधील बाळासाहेब ओव्हाळ आणि लातूर जिल्ह्यातील अहमदपूर मतदारसंघातील दिलीप देशमुख या ४ जणांचा समावेश आहे. तर, अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविणारे भाजपचे पालघर जिल्हा सरचिटणीस संतोष जनाठे यांनी भाजपच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
पक्षाच्या उमेदवारांविरोधात बंडखोर उमेदवारांनी आपला अर्ज मागे घ्यावा अन्यथा त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. तर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील दसरा मेळाव्यातून तिकीट न मिळालेल्या कार्यकर्त्यांची माफी मागितली होती. असं असूनही शिवसेना-भाजपमधील ५० असंतुष्ट नेते बंडखोरी करून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
हेही वाचा-
आदित्य ठाकरेंविरोधात लढणाऱ्या उमेदवाराची संपत्ती 'एवढी'!
शिवसेना युतीत सडली आणि १२४ वर अडली- राज ठाकरे