भाजपाच्या सभेने अडवली काँग्रेस कार्यकर्त्यांची वाट

कांदिवली - महापालिका निवडणुकीत प्रत्येक पक्ष दुसऱ्या पक्षाला कमी लेखण्यात व्यस्त आहे. बुधवारी वॉर्ड क्रमांक 39 च्या कांदिवली क्रांतीनगरमध्ये भाजपाच्या वतीने एका महासभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत भाजपा प्रवक्ता प्रेम शुक्ला प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. जिथे सभा घेण्यात आली तिथेच काँग्रेसचं स्थानिक प्रचार कार्यालयही आहे. त्यामुळे जेवढा वेळ भाजपाची सभा सुरू होती तोपर्यंत काँग्रेस कार्यकर्ता आपल्या कार्यालयात ताटकळत होते. सभेत प्रेम शुक्ला यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला. महापालिका निवडणुकीत भाजपा शिवसेनेवर सर्जिकल स्ट्राईक करणार अशी टीका या वेळी प्रेम शुक्ल यांनी केली.

पुढील बातमी
इतर बातम्या