फक्त वडिलांची इच्छा पूर्ण करायला मुख्यमंत्री झालात का? चंद्रकांत पाटील यांचा सवाल

तुम्हाला बांध काय आहे हे कळत नाही. एकर, हेक्टर कळत नाही. ‘एमएसपी’,‘एफआरपी’ म्हणजे काय हेही कळत नाही. मग काय फक्त वडिलांची इच्छा पूर्ण करायला मुख्यमंत्री झालात का? असा खोचक सवाल भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला.  

अवकाळी पावसापाठोपाठ नुकत्याच झालेल्या गारपीटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला होता. तात्काळ मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं. तरीही अजून शेतकऱ्यांना सरकारकडून मदत मिळालेली नाही. असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. 

हेही वाचा- ‘वीर सावरकर कितने वीर?’ पुस्तकावर बंदी घालण्याची आशिष शेलार यांची मागणी

मुख्यमंत्री म्हणतात साखरेसंदर्भातील विषय आला की मी जयंत पाटलांकडे पाहतो. महसूल संदर्भातील विषय आला की मी बाळासाहेब थोरातांकडे बघतो, मग तुम्ही काय करता? शेतीतलं तुम्हाला काहीच कळत नाही, तर तुम्ही मुख्यमंत्री वडिलांची इच्छा पूर्ण करायला झालात का? शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या आयुष्यात कधीही कोणतं पद घेतलं नाही. पण आताच्या शिवसेनेत पहिल्यांदाच आमदार झालेल्या आदित्य ठाकरेंनासुद्धा कॅबिनेट मंत्रीपद दिलं जात आहे. यामुळे शिवसेनेतील नेते नाराज असल्याचंही पाटील म्हणाले.

हेही वाचा- आदित्य यांच्याकडे पर्यावरण खात्याची जबाबदारी?

पुढील बातमी
इतर बातम्या