नाथाभाऊंना लिमलेटची गोळी की कॅडबरी? चंद्रकांत पाटील

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाऊन दाखल झालेले एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशावरून सध्या चांगलेच आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. नाथाभाऊंना आता लिमलेटची गोळी मिळणार की कॅडबरी हे आता बघायचं आहे, अशी प्रतिक्रिया देणारे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना खडसेंनी सडेतोड उत्तर दिल्यावर ‘रात गयी, बात गयी’ म्हणत पाटील यांनी विषयाला पूर्णविराम दिला.

एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशावर भाष्य करताना, नाथाभाऊंना भाजपने भरपूर काही दिलं आहे. त्यांच्या प्रश्नावर बसून मार्ग काढता आला असता, पण त्यांनी राष्ट्रवादीत जायचा निर्णय घेतला. तुमचं समाधान होईल असं देऊ, असं आश्वासन राष्ट्रवादीने त्यांना दिलं आहे. आता एखाद्याचं लिमलेटच्या गोळीनेही समाधान होतं आणि एखाद्याचं कॅडबरीनेही. नाथाभाऊंना यापैकी लिमलेटची गोळी मिळणार की कॅडबरी? की कुठलाही पर्याय समोर नसल्याने नाथाभाऊ समाधान मानून घेतात,  हेच आता बघायचं आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. (bjp leader chandrakant patil slams eknath khadse for joining ncp)

हेही वाचा- पहाटे शपथ घेताना तुम्हाला राष्ट्रवादी चालते, मग मला का नाही?- एकनाथ खडसे

नाथाभाऊंच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीस यांनी अनेकवेळा आपली भूमिका मांडलेली आहे. केवळ राज्याच्या भल्यासाठी देवेंद्र फडणीस शांत रहात आहेत. शांत राहणं हा त्यांचा कमकुवतपणा नाही, तर त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे, अशी बाजूही चंद्रकांत पाटील यांनी मांडली. 

त्यावर चंद्रकांतदादा तुमचा भाजपाशी संबंध काय? तुम्ही तर कुल्फी आणि चॉकलेट मिळावं म्हणून भाजपामध्ये आलात, तसंच माझ्या मागे ईडी लावली तर मी सीडी लावेन, असं म्हणत एकनाथ खडसे यांनी चंद्रकांत पाटील यांना उत्तर दिलं.

त्यावर प्रसारमाध्यमांनी प्रतिक्रिया विचारली असता पाटील यांनी ‘रात गयी, बात गयी’ म्हणत उत्तर देण्याचं टाळलं.

हेही वाचा- यापुढं माझं नाव घ्याल तर… अंजली दमानियांचा खडसेंना इशारा 

पुढील बातमी
इतर बातम्या