अंधेरीत भाजपा प्रचार कार्यालयाचं उद् घाटन

  • कल्याणी उमरोटकर & मुंबई लाइव्ह टीम
  • सत्ताकारण

अंधेरी - महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. महानगरपालिकेवरचं शिवसेनेचं वर्चस्व मोडून काढण्याची तयारी भाजपाकडून केली जातेय. प्रचारात कुठेही कमतरता राहू नये यासाठी भाजपाने मुंबईत अनेक ठिकाणी प्रचार कार्यालयं सुरू करण्याचं ठरवलंय. अंधेरी पूर्व वॉर्ड क्रमांक 80 येथील गुंदवली परिसरात भाजपाकडून पालिका निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी पहिलंच प्रचार कार्यालय उघडण्यात आलं. शनिवारी मुंबई भाजपा अध्यक्ष आशीष शेलार यांनी या कार्यालयाचं उद् घाटन केले. भाजप जिल्हा सरचिटणीस सुनील यादव यांच्या नेतृत्वाखाली हे कार्यालय उघडण्यात आलं. प्रचंड जनसंपर्क आणि केलेल्या कामांच्या जोरावर यादव यांना आपण ही निवडणूक जिंकू, असा विश्वास आहे. महानगरपालिकेची निवडणूक लढवण्यासाठी ते इच्छुक उमेदवार आहेत. त्यामुळे इथे शिवसेनेला कडवी झुंज मिळणं अपेक्षित आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या