आरोग्य शिबिराचं आयोजन

  • सत्यप्रकाश सोनी & मुंबई लाइव्ह टीम
  • सत्ताकारण

कांदीवली - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधत भाजपाच्यावतीनं आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. चारकोप सेक्टर 5 वॉर्ड क्रमांक 18 चे विधानसभाध्यक्ष सुमेश आम्ब्रे यांच्यावतीने या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याशिबिराचे उद्घाटन खासदार गोपाळशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. भाजपा नेहमी लोकहिताची कामं करत असल्याची प्रतिक्रीया खासदार गोपाळ शेट्टी यांनी दिली. या अगोदर आम्ही गरीबांना ब्लॅकेंट वाटप, रुग्णालयात फळ वाटप केल्याची माहिती सुमेश आम्ब्रे यांनी दिली. या शिबिराचा 200 हून अधिक लोकांनी लाभ घेतला. 

पुढील बातमी
इतर बातम्या