भाजपा कार्यकर्ते लागले कामाला

काळबादेवी - मुंबई महानगर पालिकेत भाजपा-शिवसेना युती होणार की नाही हे जरी अजून गुलदस्त्यात असले तरी भाजपा कार्यकर्ते मात्र पालिका निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे पाहायला मिळत आहे. काळबादेवी परिसरातील विविध ठिकाणी भाजपा कार्यकर्ते प्रचार करताना दिसत आहेत. या परिसरात जास्तीत जास्त मतदार हे गुजराती असल्याने या मतांसोबत मराठी भागातील मते मिळवण्यासाठीही भाजपाकडून प्रयत्न केले जात आहेत. यासाठी भाजपाने प्रचार गाडीही तयार केली असून, ही गाडी संपूर्ण परिसरात फिरून भाजपाचा प्रचार करणार आहे. विशेष म्हणजे युवा मोर्चाचे अध्यक्ष आकाश राज पुरोहित हे संपूर्ण यंत्रणेवर लक्ष ठेवणार आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या