उत्तर भारतीय मतदारांसाठी भोजपुरी कलाकार रिंगणात

मुंबईत उत्तर भारतीय मतदारांची संख्या पाहता भाजपाकडून त्यांना आकर्षित करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. मुंबईत असे काही मतदारसंघ आहेत, ज्यात उत्तर भारतीय मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. यामध्ये प्रामुख्यानं उत्तर मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघांचा समावेश होतो. याच पार्श्वभूमीवर भाजपनं आता या ठिकाणी भोजपुरी कलाकारांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

मनोज तिवारींची सभा

खासदार आणि दिल्ली भाजपा अध्यक्ष मनोज तिवारी हे आज सोमवारी मुंबईत भाजपाच्या रॅलीला संबोधित करणार आहेत. उत्तर भारतीय मतदारांच्या ठिकाणी भाजपाने मनोज तिवारी यांच्या अनेक रॅलीचं आयोजन केलं आहे. मुंबई व्यतिरिक्त देशातील अन्य भागांमध्ये जाऊन मनोज तिवारी हे रॅलीला संबोधित करणार आहेत.

रवि किशनही रिंगणात

मनोज तिवारी यांच्याआधी भोजपुरी अभिनेता रवी किशन यांनी देखील भाजपाचा प्रचार केला होता. याव्यतिरिक्त निरहुआदेखील भाजपाच्या प्रचारात सहभागी होणार असल्याची चर्चा आहे.


हेही वाचा -

उर्मिला मातोंडकरला हवंय पोलिस संरक्षण

मनोज कोटक यांच्यासमोर तोगडीयांचा उमेदवार रिंगणात


पुढील बातमी
इतर बातम्या