पालिका नगरसेवकांच्या संख्येत वाढ, २२७ वरून २३६

मुंबईत नगरसेवकांची संख्या वाढवण्यात आली आहे. मुंबई महापालिकेतील नगरसेवकांची संख्या २२७ वरून २३६ करण्यात आली आहे. या संदर्भात झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई महानगरपालिकेतील ९ प्रभाग वाढण्याचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला असल्याची माहिती राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिलीय. त्यानुसार मुंबई महापालिकेत २२७ ऐवजी २३६ नगरसेवक असणार आहेत.

दर १० वर्षांनी होणाऱ्या जनगणनेच्या आधारे नगरविकास विभागातर्फे महापालिका- नगरपालिकांमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात नगरसेवकांची संख्या निश्चित केली जाते. महापालिकांची सध्याची नगरसेवकांची संख्या ही सन २०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीच्या आधारावर निश्चित करण्यात आलीय.

नगरसेवक संख्या वाढवताना राजकीय फायद्याचे गणितही डोळ्यासमोर ठेवलं जातं. त्यामुळे मुंबईतील नगरसेवक संख्या वाढवण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.


पुढील बातमी
इतर बातम्या