अशोक चव्हाण-नारायण राणे आमने सामने

मुंबई - राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर पैसे घेऊन तिकीटं दिल्याचा आरोप केला होता. त्या आरोपानंतर मुंबईत झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत नारायण राणे आणि अशोक चव्हाण प्रथमच समोरासमोर आले. या बैठकीमध्येही नारायण राणे आक्रमक दिसत होते. तर अशोक चव्हाण यांची देहबोली नेहमीप्रमाणे सौम्य होती. मात्र दोघांमधील संबध कसे आहेत हे त्यांचे चेहरे नक्की सांगत होते.

पुढील बातमी
इतर बातम्या