धनगर आरक्षणाचा अहवाल लवकरच केंद्राकडे पाठवणार - मुख्यमंत्री

मराठा समाजाला एसई-बीसी या नव्या प्रवर्गांतर्गत आरक्षण देण्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या आधीच केली आहे. तर दुसरीकडे धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठीही राज्य सरकार सकारात्मक असल्याचं सांगत धनगर समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यासाठीचा अहवाल लवकरच केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार असल्याचंही त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर सांगितलं आहे. 

अनुसूचित जमातीत आरक्षण हवं

मराठा समाजाची आरक्षणाची मागणी असतानाच धनगर समाजाकडून स्वतंत्र अनुसूचित जमाती प्रवर्गात आरक्षण मिळावी अशी मागणी आहे. धनगर समाजाला व्हिजेएनटी प्रवर्गात आरक्षण आहे. पण धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण हवं आहे. कायद्यात धनगर समाजाला आरक्षण असल्यानं हा मुद्दा आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा वेगळा असल्याचं म्हणत मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाला आरक्षण देण्यासंबंधीचा अहवाल सादर झाल्याचं सांगितलं आहे.

अधिकार केंद्राला

धनगर समाजाला व्हिजेएनटीमध्ये साडेतीन टक्के आरक्षण असल्यानं, त्यांना अऩुसूचित जमातीत आरक्षण हवं असल्यानं असं आरक्षण देण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. त्यामुळं यासंबंधीचा अहवाल लवकरच केंद्राकडे पाठवण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. 


हेही वाचा - 

एसई-बीसी प्रवर्गात मराठा समाजाला आरक्षण, मुख्यमंत्र्यांची अधिवेशनाआधीच मोठी घोषणा

उद्धव ठाकरे म्हणताहेत, पहले मंदिर फिर सरकार


पुढील बातमी
इतर बातम्या