नगरसेवकांना जेव्हा जाग येते

अंधेरी - निवडणुकांचा हंगाम जवळ आला बऱ्याच लोकप्रतिनिधींना ख़डबडून जाग येते. मग हे नगरसेवक आपापल्या प्रभागात विकासकामांचा धडाका लावतात. आदर्शनगर नं. 2 येथील अष्टभुजा अंबिका मार्गवरील दुरावस्था झालेल्या खेळाच्या मैदानाकडे गेल्या 15 वर्षांपासून दुर्लक्ष झाले होते. पण आता निवडणुका जवळ आल्यावर स्थानिक नगरसेवकाने बॅनर लावून मैदानाच्या सुशोभिकरणाचे संकेत दिले आहेत.

येथील शिवसेना नगरसेवक राजू पेडणेकर यांचा पूर्वीचा प्रभाग क्र.61 महिलांसाठी राखीव झाला असून, त्यांचा जुना प्रभाग विभाग प्रभाग क्र.60 (खुलावर्ग) मध्ये विभागला गेला आहे. आता प्रभागाची चिंता मिटल्यावर राजू पेडणेकर यांनी बॅनर, पोष्टर लावून मतदारांना आकर्षित करण्यास सुरुवात केली आहे. आता येत्या चार महिन्यांत शिल्लक निधी वॉर्डात खर्च करून विकासकामाचा बार उडवून देण्याचा पेडणेकरांचा मनसुबा आहे. "अचानक बॅनर लागल्याने सामान्य जनतेमध्ये हे बॅनर चर्चेचा विषय बनले आहेत", असे स्थानिक रहिवाशी आनंद दत्ता यादव आणि अजय कांबळे यांनी सांगितले.

पुढील बातमी
इतर बातम्या