'काँग्रेसचा शिवसेनेला छुपा पाठिंबा'

नरिमन पॉइंट - राष्ट्रवादी पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्यावर गंभीर आरोप केलाय. निरुपम ज्या पक्षातून काँग्रेसमध्ये आले त्या पक्षाला आगामी महापालिका निवडणुकीत छुपा पाठिंबा देतायेत का? त्यामुळे निरुपम राष्ट्रवादी सोबत युती न करता स्वबळावर निवडणूक लढवणार आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.

नुकत्याच एका आदिवासी आश्रमशाळेत सामूहिक बलात्कार होत असल्याची घटना समोर आली. या घटनेनंतर त्या आश्रमशाळेतील डझनभर मुलींनी आमच्यावर सामूहिक बलात्कार होत असल्याची खळबजनक कबूली दिली, अशी माहिती मलिक यांनी दिली. त्यामुळे बालकल्याणमंत्री, आदिवासी मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी नैतिकता बाळगून राजीनामा दयावा, अशी मागणी मलिक यांनी केली. तसंच राज्यातील सर्व आदिवासी आश्रमशाळेतील मुला आणि मुलींची मेडिकल चाचणी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. या सरकारच्या काळात सातत्यानं अशा घटना समोर येत आहेत. त्यामुळे राज्यातील स्थिती बदलत असल्याचा सरकारचा दावा खोटा असल्याचं मलीक यांनी स्पष्ट केलं.

पुढील बातमी
इतर बातम्या