बाॅसच्या आदेशानंतर कोळंबकर करणार युतीचा प्रचार

वडाळा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर हे शिवसेना-भाजपा उमेदवाराच्या प्रचारात उतरल्याने पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर कालिदास कोळंबकर शिवसेना-भाजप युतीचा प्रचार करणार असल्याचं समोर येत आहे.

युतीचा प्रचार करणार

काँग्रेसचे दक्षिण मध्य मुंबईतील उमेदवार एकनाथ गायकवाड यांच्याकडून अद्याप कोणताही संपर्क झालेला नाही. तसंच, युतीचे उमेदवार असलेले शिवसेनेचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे आपल्या संपर्कात आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर मी युतीचा प्रचार करणार असल्याची माहिती सोमवारी कालिदास कोळंबकरांनी यांनी दिली.

बॉसच्या आदेशानंतर प्रचार

याबाबत कोळंबकर यांनी, 'मला अजून बॉसचा आदेश आला नाही. त्यामुळं मी अजून काही ठरवलं नाही, असं वक्तव्य त्यांनी केलं. त्यावेळी बॉस म्हणजे कोण? असं विचारलं असता, मी भविष्यात ज्या पक्षात जाणार आहे, त्या पक्षाचे बॉस, असं त्यांनी स्पष्ट केलं.


हेही वाचा -

कार्यकर्त्यांमधील बाचाबाचीप्रकरणी उर्मिला मातोंडकर यांच्याविरोधात तक्रार दाखल

वडाळ्यातील पोर्ट ट्रस्ट पादचारी पूल बंद


पुढील बातमी
इतर बातम्या