मुंबई काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ फुटला

  • जयाज्योती पेडणेकर & मुंबई लाइव्ह टीम
  • सत्ताकारण

मालवणी - काँग्रेसचा मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ रविवारी मालवणीतील म्हाडा मैदानात फुटला. काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा, प्रिया दत्त, एकनाथ गायकवाड, महाराष्ट्र काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत, महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश, अमीन पटेल, आमदार असलम शेख, काँग्रेस सचिव भूषण पाटील आदींच्या उपस्थितीत काँग्रेसचा संकल्प जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला.

निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपा एकत्र येणार, हा दिखावा असल्याचा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला. गेली 20 वर्ष सेना भाजपाने घोटाळे करत महापालिकेत सत्तेत राहून फक्त मलई खाल्ली असल्याचं निरुपम म्हणाले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी देश विकण्याचं काम करत असल्याचा आरोप काँग्रेस प्रभारी मोहन प्रकाश यांनी केला.

पुढील बातमी
इतर बातम्या