निवडणुकीच्या तोंडावर नगरसेवक लागले कामाला

कांदिवली - आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच नगरसेवक कामाला लागले आहेत. कांदिवलीच्या वॉर्ड क्रमांक 28च्या नगरसेविका गीता यादवही यात मागे नाहीत. त्यांनीही कांदिवलीत नाले दुरुस्तीच्या कामाचा सपाटा लावलाय. यामध्ये एकतानगर येथील सहयोग लेन नाला, जनप्रिया सोसायटी नाला, जनकल्याणनगर नाला या नाल्यांच्या दुरुस्तीचं भूमिपूजनही झालंय. पाच वर्षांत न केलेलं नाल्यांच्या दुरुस्तीचं काम हाती घेतल्यामुळे इथल्या रहिवाशांकडून आश्चर्य व्यक्त होतंय. फंड पास होण्यास विलंब झाल्यामुळे ही सर्व कामं हाती घेण्यास उशीर झाल्याचं नगरसेविका गीता यादव यांनी सांगितलं.

पुढील बातमी
इतर बातम्या