भायखळ्याऐवजी आझाद मैदानावर कार्यकर्त्यांचा एल्गार

कोरेगाव-भीमा हिंसाचारातील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना ताबडतोब अटक करण्याच्या मागणीसाठी भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी २६ मार्च रोजी भायखळा ते विधान भवन अशी मोर्चाची हाक दिली होती. परंतु मुंबई पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारल्याने भारिप बहुजन महासंघाचे राज्याच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तसेच आझाद मैदान इथं जमले.

का नाकारली परवानगी?

मिलिंद एकबोटे यांच्याप्रमाणे संभाजी भिडे यांनाही त्वरीत अटक करा, या मागणीसाठी सोमवारी भायखळातील जीजामाता उद्यान ते विधान भवन असा एल्गार मोर्चा काढण्याचं प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केलं होतं. परंतु दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्याने पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली. मोर्चा भायखळा इथून काढण्याऐवजी थेट आझाद मैदानावर जमून आपली भूमिका मांडावी, असं आवाहन पोलिसांनी आंबेडकर यांना केलं आहे.

सध्या दहावीच्या परीक्षा सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर शहरात उद्भवणाऱ्या कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून या मोर्चाला मुंबई पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली आहे.

- दीपक देवराज, पोलिस उपायुक्त, प्रवक्ते

प्रकाश आंबेडकर नाराज

पोलिसांनी या एल्गार मोर्चाला नकार दिल्याने आंबेडकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मोर्चा नाकारत राज्य सरकार लोकशाहीचा गळा आवळण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप त्यांनी सरकारवर केला.

राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत

आंबेडकर यांनी मोर्चाची हाक देताच राज्यभरातील कानाकोपऱ्यातून भारिप बहुजन महासंघाचे कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. यामध्ये प्रामुख्याने अकोला, हिंगोली, औंगाबाद, नाशिक, नागपूर, चंद्रपूर, बीड, सोलापूर, कोल्हापूर अशा विविध ठिकाणांचा समावेश आहे.


हेही वाचा-

आंबेडकरांच्या मोर्चाला पाठिंबा नाही- रामदास आठवले

मोदी दंगलखोरांच्या पाठिशी, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी आरोप

संभाजी भिडेला अटक करा, प्रकाश आंबेडकर यांचं सरकारला 'अल्टीमेटम'


पुढील बातमी
इतर बातम्या