'शेतकरी मोर्चेकऱ्यांसाठी विशेष ट्रेनची सोय करा'

आपल्या मागण्यांसाठी मुंबईत धडकलेल्या शेतकरी मोर्चेकऱ्यांना पुन्हा नाशिकला परतण्याकरता सरकारने विशेष ट्रेन किंवा इतर सोय उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आमदार हेमंत टकले आणि आमदार जयवंत जाधव यांनी केली.

'वेळीच लक्ष घा'

दबलेल्या आदिवासी, कष्टकऱ्यांचे जेव्हा प्रश्न सुटत नाहीत तेव्हा ते वेगळ्या विचारसरणीकडे वळतात. नाशिक जिल्ह्यातही आता या वेगळ्या विचारसरणीचा धोका उद्भवू लागला आहे. त्यामुळे सरकारने याकडे वेळीच लक्ष घा, असा सल्ला आमदार हेमंत टकले यांनी विधान परिषदेमध्ये सरकारला दिला. 

सरकारच्या ज्या योजना तयार होतात त्या कागदावरच राहतात. त्या आदिवासींपर्यंत पोहोचत नाहीत. ज्यावेळी नाशिकहून हा मोर्चा निघाला. तो कसाराच्या पुढे येईपर्यंत सरकारला मोर्चाची व्याप्ती समजली नव्हती, असा टोलाही त्यांनी सरकारला लगावला.

पुढील बातमी
इतर बातम्या