अखेर रस्ता दुरुस्तीला सुरुवात

  • कल्याणी उमरोटकर & मुंबई लाइव्ह टीम
  • सत्ताकारण

जोगेश्वरी - निवडणुकीच्या तोंडावर जोगेश्वरी पूर्वेकडील सुभाषरोड या रस्त्याच्या दुरुस्तीला 4 डिसेंबरपासून सुरुवात झालीये. खड्ड्यांमुळे अनेक महिन्यांपासून या रस्त्याची चाळण झाली होती. नगरसेविका उज्ज्वला मोडक यांच्याकडे वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नव्हती. हा स्टेशन आणि हाय-वेला जोडणारा मुख्य रस्ता आहे. त्यामुळे प्रवासी आणि वाहनचालकांना या रस्त्यावरून ये-जा करताना खड्ड्यांमुळे त्रास होत होता. रस्ता दुरुस्तीसाठी ठेवलेल्या खडीचे ढिगारे अनेक दिवसांपासून तसेच पडून होते. मात्र महापालिका निवडणूक तोंडावर आल्यावर नगरसेविकेला जाग आल्याचा आरोप करण्यात येतोय.

पुढील बातमी
इतर बातम्या