महाअधिवेशनापूर्वीच मनसेला गळती; धर्मा पाटलांच्या मुलाचा राष्ट्रवादीत प्रवेश

पक्षाला उभारी देण्यासाठी ऐकीकडे मनसे (MNS) पक्ष प्रमुख राज ठाकरेंनी आज गोरेगाव येथे महाअधिवेशनाचे आयोजन केले असताना. त्या अधिवेशनाच्या दिवशीच शेतकरी धर्मा पाटील यांचे पूत्र नरेंद्र पाटील यांनी पक्षला सोडचिठ्ठी दिली आहे.नरेंद्र पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस(NCP)मध्ये त्यांनी प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र पाटील यांनी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला होता.

हेही वाचाः- डाँन मन्या सुर्वे नाना पाटेकर यांचा भाऊ, त्यांनीच सांगितलं

धर्मा पाटील या ८० वर्षांच्या शेतकऱ्याने जमीन अधिग्रहणात गेलेल्या आपल्या जमिनीला योग्य मोबदला न मिळाल्याने न्याय मिळवण्यासाठी शासनाच्या संबंधित विभागाकडे वारंवार खेटे घातले. मात्र, प्रशासनाच्या उदासीनतेपुढे ते हतबल झाले. मंत्रालयात ८० व्या वर्षी शेतकरी धर्मा पाटील यांनी विष घेऊन आत्महत्या केल्यानंतर प्रसार माध्यमांनी हा मुद्दा उचलून धरला. वडिलांच्या आत्महत्येनंतर भूसंपादन प्रक्रियेतील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्याच्या निषेधार्थ धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांनी विखरण गावातील मोबाईल टॉवर चढून आत्महत्येचा इशाराही दिला होता. दरम्यान, त्यांनी आपल्या आईसह तत्कालीन फडणवीस सरकारविरोधात आंदोलनही छेडले होते.

हेही वाचाः-अमित ठाकरे यांची मनसेच्या नेतेपदी निवड

त्यावेळी पाटील कुटुंबियांच्या मागे मनसे पूर्ण ताकदीने उभी राहिली. त्यावेळी नरेंद्र पाटील यांनी मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेऊन मनसेत अधिकृत प्रवेश केला. त्यानंतर धुळ्यातून पाटील यांना मनसेने उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर केवळ चारच महिन्यांत त्यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आणि आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला. मुंबईत मनसेचे राज्यव्यापी अधिवेशन सुरु असताना आणि राज ठाकरे यांनी पक्षात धोरणात्मक बदल केले असतानाच पाटील यांनी पक्ष सोडल्याने सर्वत्र याची चर्चा सुरु आहे.

हेही वाचाः- अश्लिल व्हिडीओ शिक्षकांच्या ग्रुपवर टाकणारा शिक्षक निलंबित

पुढील बातमी
इतर बातम्या