एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री - देवेंद्र फडणवीस

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. आज संध्याकाळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. 

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे राजभवनात जाऊन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा केला. यानंतर राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना पेढा भरवून अभिनंदन केलं. दरम्यान आज संध्याकाळी दोन्ही नेत्यांचा शपथविधी होणार आहे.  

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "या सर्व परिस्थितीमध्ये शिवसेना आमदारांची कुचंबना होत होती. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी वेगळी भूमिका घेतली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत न जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर एक पर्यायी सरकार देणं गरजेचं होतं. म्हणून आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेना विधीमंडळ गट, भाजप आणि 16 अपक्ष या सर्वाच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील."

सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र येत पत्रकार परिषद घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 2019 साली भाजप आणि युतीचे सरकार होईल अशी अपेक्षा होती. मात्र दुर्दैवाने त्यावेळचे आमचे मित्र शिवसेनाप्रमुखांनी वेगळा निर्णय घेतला. बाळासाहेब ठाकरेंनी आजन्म ज्यांचा विरोध केला, अशा कॉंग्रेससोबत युती केली. जनतेने युतीला मत दिले होते. परंतु निकालानंतर शिवसेनेने निर्णय बदलला.


हेही वाचा

"यह तो झांकी है…. मुंबई महापालिका अभी बाकी है…!" भाजपचा शिवसेनेला इशारा

उद्धव ठाकरे यांच्या राजिनाम्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले...

पुढील बातमी
इतर बातम्या