एल्फिन्स्टन पूल चेंगराचेंगरी : दोषींवर कारवाई करणार - मुख्यमंत्री

एल्फिन्स्टन-परळ यांना जोडणाऱ्या पादचारी पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीतील जखमींची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी रात्री उशिरा केईएम रुग्णालयात जाऊन भेट घेतली. मुख्यमंत्री दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर होते. तिथून आल्यानंतर त्यांनी थेट जखमी आणि त्यांच्या नातेवाईकांची भेट घेतली.

या चेंगराचेंगरीत सुमारे 22 जणांचा मृत्यू झाला, तर 39 जण जखमी झाले आहेत. या अपघातामुळे संपूर्ण महाराष्ट्र दु:खात असल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

'हा अपघात घडल्यानंतर आपण पियुष गोयल यांच्या संपर्कात होतो. गोयल यांनी एल्फिन्स्टन चेंगराचेंगरीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी दोषींची चौकशी करण्यात येईल आणि त्यांच्यावर कारावाई देखील केली जाईल. मुंबईतील सर्व पुलांचे ऑडिट करण्यात येईल,' असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.


हेही वाचा - 

'या' स्थानकांवरही होऊ शकते चेंगराचेंगरी

पुढील बातमी
इतर बातम्या