आठवडी बाजारावर वादाची ठिणगी

बोरीवली - शेतकऱ्यानं आपला माल थेट ग्राहकांंपर्यंत पोहचवावा या हेतूनं आठवडी बाजार ही संकल्पना सुरु झाली. मात्र आता हाच आठवडी बाजार वादाचा मुद्दा ठरलाय. बोरीवली पश्चिममधल्या देवीदास लेन एक्वेरिया गार्डन टॉवरच्या ग्राउंडमध्ये शिवसेनेच्या इच्छुक उमेदवार दीपा पाटील यांच्या पुढाकारानं आठवडी बाजार भरवण्यात आला. मात्र, ती जागा पार्किंगची असल्याचं सांगत भाजपा आमदार मनिषा चौधरी यांनी तो बंद केला.

दीपा पाटील यांनी मात्र याला विरोध केलाय..राजकीय हेतून हा प्रकार होत असून आता दुसरीकडे आपण आठवडी बाजार सुरू करणार असल्याचा विश्वास दिपा पाटील यांनी व्यक्त केला. शिवसेना आणि भाजपात होणारे वाद हे काही नवे नाहीत. पण, आठवडी बाजारावरुन सुरू झालेला हा वाद पालिका निवडणुकीच्या आधी निवळेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

पुढील बातमी
इतर बातम्या