आम्ही जायचं तरी कुठून?

प्रभादेवी -  मुंबईत सध्या मोकळा श्वास घेण्यासाठी जागाच उरलेली नाही. त्यात विकासकामं आणि प्रकल्पांच्या नावाखाली उद्यान आणि मैदानांवर गदा आणली जातेय. अशीच काहीशी स्थिती आहे प्रभादेवीच्या मैदान आणि उद्यानाची. इथं मेट्रो 3 या प्रकल्पासाठी नदूला मैदान आणि सानेगुरुजी मैदान बंद करण्यात आलाय. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळीलय.

मुलांना खेळण्यासाठी, वृद्धांना बसण्यासाठी,मॉर्निंग वॉकसाठी असलेलं गार्डन आता काही दिवसांसाठी नाही तर तब्बल 5 वर्ष बंद राहणार आहे.

या मैदानासमोरच कॉन्व्हेंट गर्ल्स हायस्कूल आहे. तिथे जाण्यासाठी या मैदानाचा वापर केल्याशिवाय पर्याय नसतो. पण हे मैदान बंद झाल्यानं जायचं कुठून असा प्रश्न इथल्या रहिवाशांना पडलाय.

पुढील बातमी
इतर बातम्या