शिवसेनेचे माजी आमदार गुलाबराव गावंडे राष्ट्रवादीत

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत गुरुवारी शिवसेनेचे माजी आमदार गुलाबराव गावंडे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. जानेवारीमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत अकोला येथे जाहीर सभा आयोजित करण्यात येणार आहे. यावेळी मोठ्या संख्येने शिवसेनेतील पदाधिकारी, कार्यकर्ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत अशी माहिती सुनील तटकरे यांनी दिली. यावेळी शिवसेना सोडण्यामागची पार्श्वभूमी जाहीरपणे सांगू असं गुलाबराव गावंडे यांनी सांगितलं.

पुढील बातमी
इतर बातम्या