हनुमाननगरच्या रहिवाशांचा मतदानावर बहिष्कार

हनुमाननगर - हनुमाननगरमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी चक्क मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे. हनुमानगरमध्ये राहणाऱ्या 15 सोसायटींमध्ये तब्बल एक दोन नव्हे तर 6 हजार रहिवाशांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय.

गेल्या अनेक वर्षांपासून हे रहिवासी इथे राहतात. 1994 मध्ये येथे एसआरएची स्कीम लागू करण्यात आली होती. मात्र, विकास तर सोडा विकासकाकडून राबण्यात येणाऱ्या या प्रोजेक्टमध्ये अनेक त्रूटी असूनही नागरिकांना विश्वासात न घेता विकासक मनमानी कारभार करत असल्याचा आरोप इथले रहिवासी करत आहेत. याची राजकीय पुढारीही दखल घेत नसल्याचं हे रहिवासी सांगतात. अनेकदा राजकीय नेत्यांकडे जाऊनही या रहिवाशांना न्याय न मिळाल्याने त्यांनी चक्क मतदानावरच बहिष्कार घातलाय. त्यामुळे, निवडणुकीच्या तोंडावर तरी आता राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते याची दखल घेऊन या रहिवाशांना न्याय मिळवून देतात का हे पहावं लागेल.

पुढील बातमी
इतर बातम्या