राजकीय पक्षांचा 'दिवाळी' धमाका

परळ - महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागलेत. प्रचार करण्याची कुठलीच संधी पक्ष सोडत नाहियेत. जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मिडियाचा चांगलाच वापर करताना प्रत्येक्ष पक्ष दिसतोय. गल्लोगल्ली सांस्कृतिक कार्यक्रम, रांगोळी स्पर्धा असे अनेक कार्यक्रम आयोजित केले जातायेत.

शिवसेना आमदार सुनील शिंदे, नगरसेविका किशोरी पेडणेकर, मनसेचे उत्तम सांड, बंटी म्हशीलकर, भाजपचे अनिरुद्ध सावंत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या रिया चव्हाण आदी दिवाळीनिमित्त घरोघरी उटणं, कंदील वाटून नागरिकांना आकर्षित करतायेत.

पुढील बातमी
इतर बातम्या