महापौरांकडून ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार

मुंबई - महापौर स्नेहल आंबेकर यांनी शंभरी पूर्ण केलेल्या दोन ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार केला. जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त त्यांच्या घरी जाऊन हा सत्कार करण्यात आला.

शनिवारी पार्क साईड III, बोरिवली इथल्या शंकर चौबळ (वय - १०३) आणि दादरच्या समृद्धी सोसायटी मधील लीला समर्थ (वय –१०१) यांचा सत्कार करण्यात आला. त्यांचा घरी जाऊन शाल, श्रीफळ, सन्मानपत्र आणि महापालिकेचे स्मृती पदक देऊन सत्कार केला. महापौरांनी ज्येष्ठांसाठी पालिकेकडून करण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिक धोरणाविषयी माहितीही दिली. या वेळी माजी महापौर विशाखा राऊत, ज्येष्ठ नागरिक महासंघाचे डॉ. मोहनदास आचरेकर, साधना महाद्वार, ज्येष्ठ नागरिक, स्थानिक मान्यवर उपस्थित होते.

पुढील बातमी
इतर बातम्या