विनयभंग प्रकरणातील आरोपीला जामीन कसा मिळतो? : राज ठाकरे

काही दिवसांपूर्वी ठाणेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 11 वर्षीय मुलीचा विनयभंग झाला होता. पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर ठाणे पोलिसांनी आरोपीला अटक केली. मात्र आरोपी अवघ्या दोन दिवसांत जामिनावर बाहेर आला. या घटनेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विनयभंगाच्या आरोपींना जामीन कसा मिळतो, असा सवाल उपस्थित केला. तसेच या प्रकरणी पीडित मुलीचा जबाब नोंदवून आरोपीला पुन्हा अटक करण्याच्या सूचनाही त्यांनी पोलिसांना दिल्या.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे 18 ऑक्टोबर रोजी ठाण्यात प्रसिद्ध मिसळ चाखण्यासाठी आले होते. यावेळी त्यांच्यासोबत मनसे नेते अमित ठाकरे, अविनाश जाधव, राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे उपस्थित होते.

ठाण्यात काही दिवसांपूर्वी ठाणेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाला होता. याप्रकरणी ठाणे पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्याच्यावर पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पण त्याला लगेच जामीन मिळाला. या घटनेनंतर भाजप, शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेने आक्रमक पवित्रा घेतला.

आरोपींवर कडक कारवाई व्हावी यासाठी मनसे आणि ठाकरे गटाने मोर्चा काढला होता. या मोर्चात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या प्रकरणावर भाष्य करत पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. हे प्रकरण बदलापूरसारखे हलके करू नका, असे राज ठाकरे म्हणाले. ती व्यक्ती कोणत्या पक्षाची आहे याने काही फरक पडत नाही, पक्षही कधीच भूमिका घेत नाही. न्यायालयही त्यांना जामीन कसा देते, असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला. अल्पवयीन मुलीचा जबाब पुन्हा नोंदवून त्या व्यक्तीला अटक करण्याच्या सूचनाही त्यांनी पोलिसांना दिल्या.


हेही वाचा

मतदान केंद्राजवळ मोबाईल फोनवर बंदी

महायुती सरकारचे रिपोर्ट कार्ड जाहीर

पुढील बातमी
इतर बातम्या