ज्येष्ठ कवी वरवरा राव यांची प्रकृती खालावली, जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू

भीमा-कोरेगाव प्रकरणातील आरोपी आणि ज्येष्ठ कवी वरवरा राव हे मागील अनेक दिवसापासून तुरूंगात आहेत. मागील अनेक दिवसांपासून त्यांची तब्येत ठिक नसल्यामुळे त्यांनी न्यायालयाकडे जामीनासाठी अर्ज केला होता. दरम्यान वरवरा राव यांची प्रकृती ढासाळल्यामुळे त्यांना सोमवारी जे.जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचाः- मुसळधार पावसामुळं हिंदमाता परिसरात साचलं पाणी

एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी कवी वरवरा राव यांची प्रकृती खालावत असून त्यांना बुद्धिभ्रम झाला आहे, असा दावा करत त्यांना आवश्यक वैद्यकीय सुविधा पुरवण्याची मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी केली होती. राव सध्या ८१ वर्षांचे असून त्यांना नुकतेच नवी मुंबईतील तळोजा तुरुंगात नेण्यात हलवण्यात आले होते. तेथे त्यांच्या खालावणाऱ्या प्रकृतीबाबत चिंता वाटत असल्याचे त्यांची पत्नी, मुलगी आणि इतर कुटुंबीयांनी सांगितले. ‘२८ मे रोजी राव यांना जेजे रुग्णालयात बेशुद्ध अवस्थेत दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृतीत सुधारणा होत नसतानाही त्यांना तीनच दिवसांत पुन्हा तुरुंगात पाठवण्यात आले. पोलिसांच्या परवानगीने त्यांचे कुटुंबीयांशी दूरध्वनीवर बोलणे होत असताना त्यांचा आवाज क्षीण झाला होता. ते गोंधळलेले वाटत होते आणि त्यांना बोलणे जड जात होते’, असे राव यांच्या पत्नीने ऑनलाइन पत्रकार परिषदेत सांगितले होते.

हेही वाचाः-Ganesh Festival 2020: चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी गावी जाता येईल, पण…

राव यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या प्रकृतीचे कारण देत जामीनासाठी ही अर्ज  केला होता. मात्र  राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA)च्या विशेष न्यायालयाने तो नामंजूर केला. दरम्यान सोमवारी राव यांची प्रकृती ढासाळल्याने त्यांना  सोमवारी रात्री जे.जे. रुग्णालयात हलवण्यात आले. चक्कर येत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या काही चाचण्या करण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे. दरम्यान, वरवरा यांची प्रकृती गंभीर असून त्यांना अत्यावश्यक सेवा असणाऱ्या रुग्णालयात न्यावे अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. राव यांची प्रकृती गेले काही दिवस ठीक नसल्याने कारागृहातच त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती त्यांच्या पत्नी हेमलता यांनी दिली. कारागृहात योग्य सुविधा नाही आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने मदत करावी अशी मागणी त्यांच्या पत्नीने केली आहे. कारागृह हे राज्य शासनाच्या अखत्यारीत येत असल्याने त्यांनी त्यात लक्ष घालावी अशी मागणीही करण्यात आली आहे. आत्तापर्यंत राव यांचा जामीन अर्ज ५ वेळा फेटाळण्यात आला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या