ठरवलं तर शिवसेना बहुमत सिद्ध करु शकते- संजय राऊत

विधानसभा निवडणुकीच्या निकालावेळी शिवसेना-भाजप यांच्या युतीला बहुमत मिळालं. मात्र सत्ता स्थापनेवरून अजूनही या दोन्हा पक्षांमध्ये वाद सुरू आहे. त्यातच मुख्यमंत्रीपदाचा वाद आता आणखीनच चिघळत चालला आहे. याबाबत नुकताच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी 'ठरवलं तर शिवसेना बहुमत सिद्ध करु शकते' असं म्हटलं आहे.

शिवसेनेचा मुख्यमंत्री

'महाराष्ट्राची जनता शिवसेनेचा मुख्यमंत्री पाहू इच्छिते. इतकंच नाही तर मुख्यमंत्रीपदासह समसमान वाटप झालं पाहिजे', अशीही मागणी संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केली. शरद पवार यांची जी भेट घेतली त्यामागे राजकारण शोधू नका असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार हे उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. तर तसं घडणार असंही मत संजय राऊत यांनी म्हटलं.

भेटीमागे राजकारण 

शुक्रवारी सकाळी याबाबत पत्रकार परिषद झाली असून या पत्रकार परिशदेत संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्याशिवाय, शरद पवार यांच्या भेटीमागे राजकारण नाही. त्यांची भेट मी अधूनमधून घेत असतो. शरद पवार हे देशाचे अनुभवी आणि ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्या अनुभवाचा फायदा होत असतो त्याचमुळं मी त्यांची भेट घेत असतो. माझ्यावर टीका होते तरीही मी भेट घेत असतो असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.


हेही वाचा -

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, आदित्य ठाकरेंची राज्यपालांकडं मागणी

भेंडी बाजार परिसरातील इमारतीला आग


पुढील बातमी
इतर बातम्या