आमदारांचा जनता दरबार

मागाठाणे - महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यात मुंबईच्या मागाठणे विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार प्रकाश सुर्वेही मागे नाहीत. त्यांनी कांदिवलीच्या अलकनंदा हाऊसिंग सोसायटीत जनता दरबारचं आयोजन केलं होतं. या जनता दरबारात स्थानिकांनी त्यांच्या मूलभूत समस्या आमदार सुर्वे यांच्यापुढे मांडल्या. या समस्या लवकरच सोडवल्या जातील, असं आश्वासन आमदार सुर्वे यांनी दिलं. मागाठणेच्या रहिवाशांची अनेक वर्षांपासून स्मशानभूमीची मागणी प्रलंबित आहे. ही मागणीही आमदार सुर्वे यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा करून मंजूर करून घेतली आहे. त्यामुळे लवकरच नव्या स्मशानभूमीचं बांधकाम सुरू होणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या