भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर पुन्हा हल्ला झाल्यानं राजकारण आणखी तापलं आहे. राज्यातला हा वाद आता दिल्लीत पोहोचला आहे. कारण भाजप नेते आज केंद्रीय गृहसचिवांना (Central Home secretory) भेटण्यासाठी गेले आहेत.
शिवसैनिकांनी मला संपण्यासाठी पुन्हा माझ्यावर हल्ला केला असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. तर आजच्या दिल्ली दौऱ्याबाबत त्यांनी त्यांच्या ट्विटरवरून माहिती दिली आहे. त्यामुळे पुन्हा केंद्रीय तपास यंत्रणाही यात उतरण्याची शक्यता आहे.
भाजप नेते यांनी ट्विट करून याबाबत माहिती देताना, उद्या १०.१५ वा. भाजपाचे शिष्टमंडळ आमदार मिहिर कोटेचा, आमदार अमित साटम, आमदार पराग शाह, आमदार राहुल नार्वेकर आणि भाजपा महापालिका नेता विनोद मिश्रा आण मी नॉर्थ ब्लॉक दिल्ली येथे केंद्र सरकारचे गृह सचिव यांना शिवसेनेचा गुंडांनी मला केलेल्या मारहाण प्रकरण संबंधात कारवाई साठी भेटणार, असं ट्विट केलं आहे.
किरीट सोमय्या यांनी रविवारी आरोप करताना म्हटलं होतं की, खार रोड पोलीस स्टेशन येथे जो माझ्यावर हल्ला झाला, तो ठाकरे सरकारनं स्पॉन्सर्ड केलेला हल्ला होता. पोलिसांना मी हल्ला होणार असल्याचं सांगितल्यावर त्यांनी व्यक्तिगत जबाबदारी घेतली आणि पोलीस स्थानकाचं दार उघडताच, बाहेर असलेल्या ७०-८० गुंडांच्या माझ्या गाड्यांना हवाली केलं. हे पाप उद्धव ठाकरेंच्या पोलिसांनी केलं असल्याचा हल्लाबोलही सोमय्यांनी केला होता.
हेही वाचा