महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे शिवसेनेकडून मुंबईत एका स्टुडिओची तोडफोड करण्यात आली होती.
स्टॅन्डअप कॉमेडियन कुणाल कामरा याने ट्विटरवर संबंधित वादावर प्रतिक्रिया देताना सविस्तर स्टेंटमेंट जारी केले आहे. आपल्या विनोदावर कोणताही राजकीय पक्ष नियंत्रण ठेवत नाही. राजकीय नेते मला धडा शिकवण्याची धमकी देत आहेत पण नेत्यांची खिल्ली उडवणे कायद्याच्या विरोधात नाही, असं त्याने म्हटलं आहे. सोबतच या प्रकरणी माफी मागणार नसल्याचंही त्याने या निवेदनामध्ये म्हटलं आहे.
My Statement असं म्हणत त्याने चार पानी पोस्ट लिहिली आहे. पहिल्या पानावर कुणाल कामरा म्हणतो, “ज्या ठिकाणी माझा शो आयोजित करण्यात आला होता, ती अशा प्रकारच्या शोचीच जागा आहे. हॅबिटट हे ठिकाण, तो स्टुडिओ जे काही घडलं त्यासाठी जबाबदार नाही. या ठिकाणी तोडफोड करण्यात आली. त्या ठिकाणी अपशब्दही वापरले गेले. लॉरी भरुन टॉमेटो आणले गेले असं मी ऐकलं कारण आम्ही जे बटर चिकन तुम्हाला वाढलं ते तुम्हाला आवडलं नाही.” असं कुणाल कामराने त्याच्या मिश्किल अंदाजात पहिल्या पानावर म्हटलं आहे.
मला धडा शिकवण्याच्या धमक्या देणाऱ्या राजकीय नेत्यांसाठी : अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा प्रत्येकाचा अधिकार आहे. तो अधिकार फक्त श्रीमंतांकडे नाही. तुमच्यासारखे लोक जोक सहन करु शकत नाहीत. एखाद्या वजनदार राजकीय माणसामुळे माझा जो अभिव्यक्तीचा हक्क आहे त्यावर काही परिणाम नाही. मी कायद्याच्या विरोधात काहीही वागलेलो नाही. राजकीय सर्कशीवर आणि राजकारणावर मी व्यंगात्मक पद्धतीने बोट ठेवलं आहे.
असो.. तरीही मी पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्याचं ठरवलं आहे. पोलिसांनी आणि न्यायालयाने माझ्याविरोधात कायदेशीर कारवाई करावी. मात्र कायदा सर्वांसाठी समान असतो त्यामुळे अशाही लोकांविरोधात कारवाई झाली पाहिजे ज्यांनी ते हॉटेल फोडलं. एक जोक ऐकून त्यांनी हॉटेल फोडलं आहे. तसंच जे निवडून आलेले नाहीत अशा महापालिका सदस्यांच्या विरोधातही कारवाई झाली पाहिजे. हॅबिटट या ठिकाणी तोडफोड करायला ते कुठलीही नोटीस न देता हातोडे घेऊन कसे आले? असे प्रश्न कुणाल कामराने विचारले आहेत.
हेही वाचा