...तर हे कामगारांचं उज्ज्वल यश - तावडे

परळ - वाचन प्रेरणा दिनानिमित्त 'जागतिकीकरणानंतरचे कामगार विश्व परिसंवाद' आणि अजित सावंत लिखित 'उठाव झेंडा बंडाचा' या पुस्तकाचं शनिवारी प्रकाशन करण्यात आलं. उच्चशिक्षण आणि सांस्कृतिकमंत्री विनोद तावडेंच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. परळच्या पूर्वेकडील दादाभाई चमारबागवाला मार्ग येथील ग्रंथाली प्रकाशन आणि नारायण मेघाजी महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था यांच्या शैक्षणिक सहकार्याने या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं.

'कामगारांचं हित आणि सुरक्षा याचा एकत्र पाठपुरावा करणारी टीम या परिसंवादातून उभी करू शकलो' 'तर हे कामगारांचं उज्ज्वल यश असेल' असं वक्तव्य तावडे यांनी केलं. या वेळी ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव, अॅड. संजय संघवी, विश्वास उटगी, सुरेश हिंगलासपुरकर, डॉ. पा. रा. किनरे, विज्ञान संस्थेचे संस्थापक डॉ. राजन तुंगारे यांची उपस्थिती होती.

पुढील बातमी
इतर बातम्या