नवाब मलिक यांच्याविरोधात तक्रार

वर्सोवा - वर्सोवातल्या भाजपच्या आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या विरोधात तक्रार दाखल केलीय. "दाऊद इब्राहिमचा माणूस रियाज भाटीच्या मदतीनं वर्सोवा विभागात माझा विजय झाला, असा खोटा आरोप नवाब मलिक यांनी केला. यामुळे माझी बदनामी झाली," असं भारती यांनी सांगितलं. यासाठी त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही भारती यांनी वर्साेवा पोलिसांकडे केली. भारती लव्हेकर यांनी वर्साेवा पोलीस स्टेशनला नवाब मलिक यांनी केलेल्या वक्तव्याची सीडीही दिली.

पुढील बातमी
इतर बातम्या