बंडखाेरीचा प्रयत्न करेल, त्याचं डोकं फुटेल, असं कुणाला म्हणाले दिलीप लांडे?

सध्याच्या स्थितीत जो आमदार बंडखोराची प्रयत्न करेल, त्याचं डोकं फुटेल, असं वक्तव्य नुकतंच शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांनी केलं आहे. शिवसेनेच्या आमदारांना फोडण्याची हिंमतही कुणी करणार नाही, असं याआधी शिवसेना नेते खासदार संजय राऊत म्हणाले होते.

भाजप सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करत असून भापजने बहुमताचा आकडा गाठावा, यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करेन, असा इशारा खासदार नारायण राणे यांनी इतर पक्षांना दिला होता. 

आमदार फुटण्याच्या शक्यतेवर दिलीप लांडे म्हणाले की, शिवसेनेच्या आमदारांना फोडणं कुणालाही शक्य नाही. जो असा प्रयत्न करेल, त्याचं डोकं फुटल्याशिवाय राहणार नाही.

शिवसेना आमदारांना हाॅटेलमध्ये ठेवण्यामागचं कारण काय? या प्रश्नावर लांडे यांनी सांगितलं की, गरज लागेल तेव्हा सर्व आमदारांना त्वरीत पोहोचता यावं म्हणून शिवसेना आमदारांना हाॅटेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. परंतु शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व आमदारांना आपल्या मतदारसंघात परत जाऊन शेतकऱ्यांना सर्वोपतरी मदत करण्यास सांगितलं आहे.


हेही वाचा-

राष्ट्रवादीचे ९ आमदार संपर्कात, भाजपचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचा दावा

उद्धव ठाकरे -अहमद पटेल यांची बैठक झालीच नाही; अफवा पसरवणं बंद करा - संजय राऊत


पुढील बातमी
इतर बातम्या