काँग्रेसची २० उमेदवारांची यादी जाहीर

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करत आहेत. तसंच, जोरदार तयारीला लागले असून, मतदारांच्या समस्या जाणून घेत आहेत. अशातच राज्यभरात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं बुधवारी उशिरा आणखी २० उमेदवारांची यादी जाहीर केली आहे

विविध उपक्रम

या यादीत मुंबईतल्या मतदारसंघातली मालाड पश्चिम असलम शेख, घाटकोपर पश्चिम मनिषा सुर्यवंशी, कलिना जॉर्ज अब्राहम, वांद्रे पश्चिम असिफ जकेरिया, वडाळा शिवकुमार लाड, भायखळा मधुकर चव्हाण या मतदारसंघातून यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार विविध उपक्रम राबवत आहेत. 

आघाडीत गोंधळ

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होऊनही दोन्ही पक्षांनी पंढरपूरमध्ये आपल्या पक्षाचे उमेदवार जाहीर केल्याचं समजतं. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसनं भारत भालके यांना तर काँग्रेसनं शिवाजीराव काळुंगे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळं आघाडीत उमेदवारी जाहीर करण्यावरून गोंधळ झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतं आहे.

२० उमेदवारांची यादी

  • नंदुरबार - मोहन सिंग

  • शिरपूर - रणजीत पावरा
  • नागपूर पूर्व - पुरुषोत्तम हजारे
  • नागपूर मध्य - ऋषीकेश शेळके
  • अहेरी - दीपक अत्राम
  • परभणी - रवीराज देशमुख
  • सिल्लोड - प्रभाकर पलोडकर
  • औरंगाबाद पश्चिम - रमेश गायकवाड
  • नाशिक मध्य - शाहू खैरे
  • मालाड पश्चिम - असलम शेख
  • घाटकोपर पश्चिम - मनिषा सुर्यवंशी
  • कलिना - जॉर्ज अब्राहम
  • वांद्रे पश्चिम - असिफ जकेरिया
  • वडाळा - शिवकुमार लाड
  • भायखळा - मधुकर चव्हाण
  • अलिबाग - श्रद्धा ठाकूर
  • अक्कलकोट - सिद्धाराम म्हेत्रे
  • पंढरपूर - शिवाजीराव काळुंगे
  • कुडाळ - हेमंत कुडाळकर
  • कोल्हापूर उत्तर - चंद्रकांत जाधव


हेही वाचा -

राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भुजबळ, अजित आणि रोहित पवारांना उमेदवारी

मनसेचे आक्रमक नेते नितीन नांदगावकर शिवसेनेत


पुढील बातमी
इतर बातम्या