भाजपकडून विधान परिषद उमेदवारांची नावं निश्चित, पंकजा मुंडेंना संधी नाहीच

भाजपकडून विधान परिषद (Vidhan Parishad Election) उमेदवारांची नावं निश्चित करण्यात आली आहेत. यात प्रवीण दरेकरांसह (Pravin Darekar) प्रसाद लाड, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, राम शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे.

तर सदाभाऊ खोत आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना मात्र संधी देण्यात आली नाही. मंगळवारी पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेसाठी उमेदवारी दिली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय.

विधान परिषदेच्या 10 जागांसाठी येत्या 20 जून रोजी निवडणूक पार पडणार आहे. याकरिता उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत 9 जून ही आहे. भाजपाच्या चार जागांसाठी इच्छुकांमध्ये चढाओढ दिसून येत आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, कृपाशंकर सिंग, पंकजा मुंडे, राम शिंदे, सदाभाऊ खोत, श्रीकांत भारतीय आदींची नावं दिल्लीत पाठवण्यात आली. त्यापैकी प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, उमा खापरे, राम शिंदे आणि श्रीकांत या पाच उमेदावारांची नावं सोमर आली आहेत.

  • 09 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करावे लागणार
  • 10 जूनला निवडणूक अर्जांची छाननी केली जाईलय
  • 13 जूनपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असेल.
  • 20 जून रोजी मतदान पार पडेल.
  • सकाळी 9 ते दुपारी 4वाजेपर्यंत मतदान होईल.
  • 20जून रोजी सायंकाळी पाच नंतर मतमोजणी होईल.
  • 20 जून रोजीच विधान परिषदेचं चित्र स्पष्ट होईल.


पुढील बातमी
इतर बातम्या