वडाळा ते सीएसएमटीसह ३ मेट्रो मार्गांना मंजुरी

राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मेट्रो १०- गायमुख ते श‍िवाजी चौक, मेट्रो- ११ वडाळा ते सीएसएमटी आणि मेट्रो १२-कल्याण-डोंबिवली-तळोजा या तीन नव्या मेट्रो मार्गांना मंजुरी दिली. या तिन्ही मेट्रो मार्गांची एकूण लांबी ५० किमी इतकी असून हे मेट्रो मार्ग उभारण्यासाठी एकूण १९,०८० हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

‘असे’ आहेत ३ मेट्रोमार्ग : 

मेट्रो-१० : गायमुख (ठाणे) ते शिवाजी चौक (मिरा रोड) 

  • मार्गाची लांबी- ९.२०९ किमी (८.५२९ किमी उन्नत, तर ०.६८ किमी भुयारी) 
  • स्थानकं- गायमुख, गायमुख रेतीबंदर, वर्सोवा चार फाटा, काशीमिरा, शिवाजी चौक (मिरा रोड) 
  • ४ उन्नत स्थानकं
  • अपेक्षित खर्च - ४,४७६ कोटी रुपये 
  • मार्च २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दीष्ट
  • एमएमआरडीएकडे जबाबदारी

 

मेट्रो-११ : वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

  • मार्गाची लांबी- १२.७७४ किमी (४ किमी उन्नत, तर ८.७६५ किमी भुयारी) 
  • स्थानकं- वडाळा आरटीओ, गणेश नगर, बीपीटी हॉस्पिटल, शिवडी मेट्रो, हे बंदर, कोल बंदर, दारूखाना, वाडी बंदर, क्लॉक टॉवर, कर्नाक बंदर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस 
  • २ उन्नत, ८ भुयारी स्थानकं
  • अपेक्षित खर्च - ८,७३९ कोटी रुपये
  • मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दीष्ट
  • एमएमआरडीएकडे जबाबदारी

 

मेट्रो-१२ : कल्याण-डोंबिवली- तळोजा   

  • मार्गाची लांबी- २०.७५६ किमी (संपूर्ण उन्नत)  
  • स्थानकं- एपीएमसी कल्याण, गणेश नगर, पिसावली गाव, गोलवली, डोंबिवली एमआयडीसी, सागाव, सोनार पाडा, मानपाडा, हादुतणे, कोलगाव, निळजे गाव, वडावली, बाले, वकलण, तुर्भे, पिसावे डेपो, पिसावे, तळोजा. 
  • अपेक्षित खर्च - ५,८६५ कोटी रुपये
  • मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दीष्ट
  • एमएमआरडीएकडे जबाबदारी

 

तिन्ही मेट्रो मार्गांमुळे प्रवासाच्या वेळेत ५० ते ७५ टक्के बचत होऊन रस्ते वाहतुकीवरील ताण हलका होण्यास मदत होईल, असा दावा करण्यात आला आहे. 


हेही वाचा-

गैरसोईंच्या गर्तेत मोनो रेल्वे!

मेट्रो ३ च्या भुयारीकरणाचं ५० टक्के काम पूर्ण


पुढील बातमी
इतर बातम्या