राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प बुधवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर करण्यात आला. १९ हजार ७८४ कोटी रुपये तुटीचा हा अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत, तर अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत सादर केला. आगामी लोकसभा निवडणुकांमुळे मांडलेल्या या अंतरिम अर्थसंकल्पात महसुली जमा ३ लाख १४ हजार ४८९ कोटी रूपयांची तर महसुली खर्च ३ लाख ३४ हजार २७३ कोटी रूपयांचा अंदाजित आहे.