मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचे संकेत? संजय राऊतांचं खळबळजनक ट्विट

महाराष्ट्र सरकार बरखास्त होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात संजय राऊत यांनी एक महत्त्वपूर्ण ट्विट केलं आहे. संजय राऊतांनी अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचे संकेत दिले असल्याचं बोललं जात आहे.

त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीच्या दिशेने...

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या एका ट्वीटमुळं राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. शिवसेनेचे प्रबळ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह बंड पुकारला आणि शिवसेनेत वादळ उठलं.

दरम्यान, महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय घडामोडीवर राऊत  म्हणाले की, भाजपचे स्वप्न पूर्ण होणार नाही. एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणी सुरू असून ते खरे शिवसैनिक आहेत आणि परत येतील. 

मुंबई ते सुरत आणि त्यानंतर गुवाहाटी येथे या आमदारांना हलवण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीमध्ये पोहोचल्यानंतर 40 आमदार आपल्यासोबत असल्याचा मोठा दावा केला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 33 आमदार आणि 7 अपक्षही पोहोचले आहेत. या सर्वांना गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू येथे थांबविण्यात आले आहे. त्यांचे स्वागत करण्यासाठी भाजप नेते सुशांत बोरगोहेन आणि पल्लब लोचन दास तेथे पोहोचले होते.


हेही वाचा

SIDनं सरकारला दोन महिन्यांपूर्वीच दिलेली बंडखोरीची कल्पना

पुढील बातमी
इतर बातम्या