शिवसेनेचे धनुष्यबाण गोठवण्यात आलं आहे. त्यामुळे आता धनुष्यबाणावर नाही शिवसेनेचा नाही शिंदे गटाचा दावा राहणार आहे. यासोबतच शिवसेना पक्षाचे नावही वापरता येणार नाही.
शिंदे गटाकडून धनुष्यबाण या चिन्हावर दावा करण्यात आला होता. त्यानंतर हे प्रकरण थेट निवडणूक आयोगाच्या दारात पोहोचलं. शिंदे गटाच्या दाव्यानंतर ठाकरे गटाने सुद्धा या प्रकरणी आपली बाजू मांडली. या दोन्ही गटांच्या दाव्यांनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक पार पडली. या बैठकीत दोन्ही गटांच्या दाव्यांवर चर्चा करण्यात आली.
ठाकरे गटाने आपल्याकडील महत्त्वाची माहिती निवडणूक आयोगाकडे सादर केली. तसेच अंधेरी विधानसभा पोट निवडणुकीत शिंदे गटाने उमेदवारच दिला नाहीये मग, चिन्ह का मागत आहेत? असा सवाल ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे केला आहे.
हेही वाचा