'हे' ४ दिवस दारुविक्री बंद

मुंबईसह राज्यभरातील तळीरामांसाठी एक महत्वाची बातमी आहे. कारण निवडणुकीच्या काळात ४ दिवस दारूविक्री बंद राहणार आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून २१ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. तसंच, २४ ऑक्टोबरला या मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळं या काळात मुंबईत ४ दिवसांसाठी सर्व प्रकारची दारुविक्री बंद राहणार असल्याची माहिती मुंबई शहरचे जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी दिली.

दारुची दुकानं बंद

राज्याभरात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर १९ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबरपर्यंत सलग ३ दिवस आणि २४ ऑक्टोबर रोजी एक दिवस अशा एकूण ४ दिवसांसाठी मुंबई शहरात सर्व प्रकारच्या दारुविक्रीवर बंदी असणार असून दारुची दुकानं बंद ठेवण्यात येणार आहेत.

अर्ज भरण्याची मुदत

राज्यात विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत सोमवारी संपली. आतापासून अर्जांची छाननी सुरु झाली आहे. सोमवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतर उमेदवारी निश्चित झाल्यावर २ दिवसांत प्रचाराला सुरूवात होणार आहे.


हेही वाचा -

राज्यभरात ५ दिवस ढगाळी हवामानासह वादळी पावसाचे

'या' परिसरात गुरूवार आणि शुक्रवारी पाणीकपात


पुढील बातमी
इतर बातम्या